मध्यप्रदेशमध्ये शिव'राज': शिवराज सिंह चौहान यांनी 9 वाजता घेतली शपथ, 15 महिन्यानंतर चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

भोपाळ- शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे 32 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवराज मध्यप्रदेशच्या इतिहासात, चारवेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले नेते आहेत. यापूर्वी ते 2005 ते 2018 पर्यंत सगल 13 वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. 20 मार्चला कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर सीएम पदाच्या शर्यतीत शिवराज सिंह सर्वात प्रमुख् दावेदार होते. शिवराज यांच्याशिवाय आतापर्यंत अर्जुन सिंह आणि श्यामाचरण शुक्ल तीन-तीन मुख्यमंत्री झाले आहेत.